Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर आव्हाडांचे स्पष्टीकरण; म्हणाले, जे सत्य आहे ते....

रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. असे ट्विट त्यांनी काल केले होते.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु असताना दुसरीकडे राजकीय मंडळींकडून मागील काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले. आव्हाडांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून आव्हाडांच्या या विधानाचा जोरदार निषेध नोंदवला आत आहे. मात्र, आज पुन्हा एकदा या वादात त्यांनी एक ट्विट केले आहे. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडले. असे जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले आहे.

Jitendra Awhad
50 खोके खर्च करून पण 50 लोक जमत नाहीत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंना सणसणीत टोला

काय आहे नेमकं आव्हाडांचे ट्विट?

आव्हाडांच्या विधानाचा आज भाजपकडून जोरदार निषेध नोंदवला जात आहे. त्यातच याच वादावर भाष्य करताना आव्हाड म्हणाले की, मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकान समोर मांडले. तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची आम्ही देऊ उत्तर. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो. असे म्हणत त्यांनी #करारा_जवाब _मिलेगा #जयशिवराय _जयभीमराय असे हॅशटॅग टाकले आहे.

काल देखील आव्हाडांनी दिले होते ट्विटकरून स्पष्टीकरण?

''रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा.'' 'आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा', असे ते या ट्विटमध्ये म्हणाले. आव्हाडांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com