Sudhir Mungatiwar
Sudhir MungatiwarTeam Lokshahi

..तर शरद पवारपासून उद्धव ठाकरे पर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू - सुधीर मुनगंटीवार

राज्यपालांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अपार आधार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही
Published on

काल बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले होते. विविध विषयावर भाष्य करताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ भर सभेत चालवला. तसेच त्यांना जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा, या शब्दात जोरदार टीका केली होती. त्यावरच आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sudhir Mungatiwar
पवार कुटुंबात फुट पडल्याच्या दाव्यावर रोहित पवारांचे भाष्य; म्हणाले, कितीही तोडलं तरी...

काय म्हणाले मुनगंटीवार?

जुने ऑडिओ ऐकून जर जनाची नाही आणि मनाची लाज ठेवायची असेल, तर शरद पवारपासून उद्धव ठाकरे पर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू आणि सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. तुम्हीच जाऊन बांधावर जाऊन सांगितलं होतं पन्नास हजारांची मदत देऊ, कुठे गेली ती मदत तुम्ही सांगितलं होतं.

आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कधी संबंध ठेवणार नाही, तुमचाच व्हिडिओ आहे, मग कोणी जनाची नाही तर मनाची ठेवावी. छगन भुजबळ बद्दल तुम्ही काय म्हणायचे. तुम्ही श्री राम आणि श्रीकृष्णाला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले. जनता निवडणुकीत लाज काढतेच. तर वाट पाहू जनता कोणाची लाज काढते. असा इशारा मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

Sudhir Mungatiwar
तुम्हालाही आवडत नाही मेथीची भाजी, मग 'हे' फायदे वाचाच रोज खाल

पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही

राज्यपाल महोदयांनी त्यांच्या विधानाचा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. राज्यपालांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अपार आधार आहे. माझ्या त्या भाष्याचे कोणी चुकीचे अर्थ काढू नये. एवढं स्पष्ट राज्यपाल बोलल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर चर्चा प्रतिक्रिया योग्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे. जो वर सूर्य, चंद्र आहे, पृथ्वी आहे, तोवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी असणार. असे मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com