Shiv Sena MLA: शिवसेनेवर कोणाचा अधिकार: 53 आमदारांना नोटीस
शिवसेनेच्या फुटीनंतर वाद मोठ्या प्रमाणवर सुरु आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे शिवसेना शाखांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे वाद गेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात सोमवारी 11 जुलै रोजी यावर सुनावणी होणार असतांना मोठी बातमी रविवारी आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या 55 पैकी 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे.
विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी 53 आमदारांना नोटीस दिली आहे. शिवसेना ठाकरे गट प्रतोद सुनिल प्रभू आणि शिवसेना शिंदे गट प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला होता. अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावासंदर्भात हा व्हिप होता. शिवसेनेतील दोन्ही गटांनी एकमेकांचा व्हीप झुगारला. या प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी सुनावणी असतांना विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी ही नोटीस बजावली आहे.
आदित्य ठाकरेंना नोटीस नाही
शिवसेनेच्या 53 आमदारांना नोटीस दिली असतांना आदित्य ठाकरेंना ही नोटीस देण्यात आली नाही. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि त्यानंतर झालेला विश्वासदर्शक ठराव या दोन्हीसाठी ठाकरे आणि शिंदे गटातर्फे व्हीप बजावला होता. आदित्य ठाकरेंही विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहाबाहेर होते. मात्र त्यांना नोटीस दिली नाही.