शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमागे ईडीचं कारण? जयंत पाटलांनी अखेर सांगितले

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमागे ईडीचं कारण? जयंत पाटलांनी अखेर सांगितले

अजित पवार आणि शरद पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक झाली होती. यावर अखेर जयंत पाटील यांनी समोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

पंढरपूर : अजित पवार आणि शरद पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक झाली होती. यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. तर ही बैठक जयंत पाटील यांच्या नातेवाईकांना ईडीची नोटीस आल्यासंदर्भात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर अखेर जयंत पाटील यांनी समोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमागे ईडीचं कारण? जयंत पाटलांनी अखेर सांगितले
कळवा रुग्णालयातील घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. सगळे पवार साहेब आणि जयंत पाटील यांचे नेतृत्व मान्य करतात, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. माझ्या भावाला ईडी नोटीस आली खरे आहे. त्याचा आणि कालच्या भेटीचा काही संबंध नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.

कोण कोणाला कधीही कुठेही भेटू शकतो. पवार आणि अजित पवार यांची भेट गुप्त नव्हती. एका उद्योगपतीच्या घरी योगायोगाने झालेली भेट आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, मंत्रिमंडळ समावेशाबाबत कोणीही आमदार कधीही मंत्री होऊ शकतो, असे सूचक विधानही जयंत पाटील यांनी केले आहे. जयंत पाटील यांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, काका-पुतण्यांच्या भेटीगाठींनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. अजित पवार फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांचा कोणत्याही प्रकारचा निषेध केला नव्हता. शिवाय अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचा निषेधही झालेला दिसला नाही. अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या सोबत तर शरद पवार विरोधांसोबत असल्यानं काका-पुतणे दोन्ही दगडांवर पाय ठेऊन आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com