आरोग्य मंत्री तानाजी सावंत अधिकाऱ्यांवर संतापले; म्हणाले...
अभिजीत उबले | पंढरपूर : शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले दिसले. शासकीय रुग्णालयात स्वच्छता कर्मचारीच सावंतांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तसेच, लवकरात लवकर स्थानिक आरोग्य प्रशासनाला रोजंदारीवर सफाई कामगार अधिकार घेण्याचे दिले.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी नातेपुते उपकेंद्राला भेट दिली. परंतु, यावेळी शासकीय रुग्णालयात सफाई कामगार नसल्याने सर्वत्र अस्वच्छता दिसून आली. यावरुन तानाजी सावंत चांगलेच संतापले. यासंदर्भात माहिती घेत असताना रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी नसल्याने समजताच सावंत यांनी संताप व्यक्त केला. मात्र, रोजंदारीवर कर्मचारी नेमण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर नाही. यामुळे कर्मचारी नेमण्यास अडचणी येत असल्याची बाब उपस्थित अधिकाऱ्यांनी मंत्री सावंत यांना सांगितली.
यावर सावंत यांनी तात्काळ सहाय्यक संचालकांना मोबाईलवरून संपर्क साधला. व किमान दोन कामगार नेमण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचे त्यांनी दिले. तसेच या कामगारांना नियमानुसार त्यांचा पगार देण्याच्या सूचनाही दिल्या.