राजकारण
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा तो झाला भाजपाचा पदाधिकारी
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भामरे हा भाजपचा पदाधिकारी झाला आहे.
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भामरे हा भाजपचा पदाधिकारी झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील निखिल भामरे हा फार्मासिस्ट तरुणानं शरद पवारांविरोधात सोशल मीडीयावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता.
पोस्ट केलेली त्यावेळी त्याचा भाजपाशी संबंध जोडण्यात आला होता. त्यावेळी भाजपाकडून नकार देण्यात आला होता. आता मात्र भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी निखिल भामरेची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन आता चर्चा रंगल्या आहेत.