PM Modi | Bhagat Singh Koshyari
PM Modi | Bhagat Singh Koshyari Team Lokshahi

मला पदमुक्त करा; राज्यपाल कोश्यारींनी पंतप्रधानांकडे केली इच्छा व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Published on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले असल्याचे आहे.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधानामुळे वादाच्या सापडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. विरोधकांकडून राज्यपाल हटावची मागणी केली गेली होती. तसेच, राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com