Amit shah
Amit shahTeam Lokshahi

देशात समान नागरी कायद्याची वेळ आलीयं- अमित शहा

अमित शहा यांची या मोठ्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका
Published by :
Team Lokshahi
Published on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. भोपाळमध्ये (Bhopal) भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितले की, सीएए, राम मंदिर, कलम ३७० आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे. याआधी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना विचारले की, देशात सर्वकाही ठीक झाले काय? यानंतर त्यांनी समान नागरी कायद्याची चर्चा केली. पक्ष कार्यालयात कोअर कमिटी आणि प्रमुख नेत्यांसोबत अनौपचारिक बैठकीत त्यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये हे पथदर्शी कार्यक्रमांतर्गत लागू केले जात आहे. मसुदा तयार केला जात आहे. शिल्लक राहिलेले काम योग्य पद्धतीने पूर्ण केले जाईल. मात्र, तुम्ही लोकांनी पक्षाला नुकसान होईल,असे कोणतेही काम करू नये. शहा म्हणाले, आगामी निवडणुकीआधी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील. मात्र, त्याची चिंता करण्याची गरज नाही. काँग्रेसची आणखी घसरण होईल. कोणतेच आव्हान नाही. बैठकीत प्रदेश भाजप अध्यक्ष व्ही.डी.शर्मा (VD Sharma), मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. शहा सायंकाळी दिल्लीला परतले.

Amit shah
बहुचर्चित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

शहा यांची मोठ्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका :

शहा म्हणाले, जातीयवाद देशाचे वास्तव आहे. या हिशेबाने प्रत्येक जातीच्या नेत्याला पद आणि महत्त्व द्यावे लागेल. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) २०१८ च्या पराभवाबाबत शहा म्हणाले, विधानसभा निवडणूक भाजप हरली, मात्र मतांचा टक्का जास्त होता. चुका झाल्या, त्याचा आढावाही घेतला. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने जनमत वाढत आहे. या प्रयत्नांत संघटनेची भूमिका आवश्यक आहे. केवळ सरकारच्या कामांनी निवडणूक जिंकली जात नाही. बळकट संघटनच निवडणूक जिंकून देईल. दिल्लीत मोठ्या नेत्यांचे कार्यकर्त्यांशी अंतर वाढले. शिस्त घटत गेली. अशी स्थिती मध्य प्रदेशात व्हायला नको,असे शहा यांनी सांगितले.

Amit shah
दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांचं पुन्हा अमित शहां विरोधात ट्विट...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com