मीरा- भाईंदर, औरंगाबादसह 9 मनपाची आरक्षण सोडत 5 ऑगस्टला
मुंबई:
औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी सोडत काढली जाईल. त्यानंतर 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर 6 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 20 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
या मनपात निवडणुका
मुंबई
ठाणे
नवी मुंबई
कल्याण डोंबवली
पुणे
पिंपरी चिंचवड
नाशिक
औरंगाबाद
नागपूर
पनवेल
वसई-विरार
कोल्हापूर
एकूण 22 मनपातील निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.