फडणवीसांनी अर्थसंकल्पामधून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला : एकनाथ शिंदे
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कोरडी आश्वासने दिलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलो आहेत. यामुळे त्यांच्याकडे काही उत्तरे नाही. त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पामधून करेक्ट कार्यक्रम केला आहे, असा निशाणा एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला आहे.
मागील 10 ते 15 वर्षांतील सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने अभ्यासपूर्ण आणि या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार केला आणि मांडला आहे. यामध्ये सर्व घटकांचा विचार केला गेला. सर्वमसमावेशक असा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी नमो योजनेची संकल्पना सुरु केली. ही सर्वात मोठी ऐतिहासिक योजना आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील हाच उद्देश आमचा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केले आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गाजर हलवा तरी दिला. त्यांनी काहीच दिले नाही. सर्व स्वत:च खाले दुसऱ्यांना उपाशी ठेवले. अडीच वर्ष राज्यात सर्व काही ठप्प होते. त्याला चालना देण्याचे काम सुरु केले आहे. या राज्यात खऱ्या अर्थाने विकासाचा मेगाब्लॉक तयार झाला होता. हा मेगाब्लॉक विकासाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यामातून दूर करण्याचे काम फडणवीसांनी केले. याचे परिणाम दृश्य स्वरुपात दिसतील. आम्ही कोरडी आश्वासने दिलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलो आहेत. यामुळे त्यांच्याकडे काही उत्तरे नाही. त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पामधून करेक्ट कार्यक्रम केला आहे, असे टीकास्त्र त्यांनी विरोधकांवर सोडले आहे.