एकनाथ शिंदे यांच्यासोबत बच्चू कडूही; दोन दिवसांपूर्वीच दिले होते संकेत

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बच्चू कडूही; दोन दिवसांपूर्वीच दिले होते संकेत

Eknath Shinde यांच्यासह 33 आमदारांचा फोटो समोर
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 33 बंडखोर आमदारांसह वेगळी वाट पकडली आहे. लवकरच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला असून यामध्ये बच्चू कडू यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वीच बंडखोरीचे संकेत दिले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी म्हंटले होते की, येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा. अपक्षांचा झटका काय असतो आणि परिणाम कसे असतील ते दिसणार आहे, असेही सूचक विधान बच्चू यांनी त्यावेळी केले होते. . तर, पुढच्यावेळी राज्य प्रहारचं येईल आणि पुढील मुख्यमंत्री प्रहारचाच असेल, असा दावाही त्यांनी केला होता.

बच्चू कडू यांनी गुवाहटीतून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे जवळपास 75 टक्के आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले आहेत. अशी काही नाराजी नाही, पण निधी वाटप, निधी वाटपातील विषमता यांमुळे काहीशी नाराजी आहे. हे सगळं चर्चा करुन झालं असतं. पण पक्षश्रेष्ठींकडून शिवसेनेच्या आमदारांकडे जे लक्ष द्यायला हवं होतं, ते झालं नाही. त्यामुळे प्रचंड नाराजी होती, असे त्यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांना जवळपास 33 आमदारांचा पाठिंबा असून त्यांचा फोटो समोर आला आहे. यात प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांचादेखील समावेश आहे. त्यापाठोपाठ आमदार महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभुराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपमान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहार कांदे, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजयकुमार रायमुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे, विश्ननाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वणगा, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनवणे, यामिनी जाधव आणि बालाजी किणीकर यांचा शिंदेंना पाठिंबा आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com