Eknath Khadse
Eknath KhadseTeam Lokshahi

मी अनेकांना देशोधडीला लावू शकतो; एकनाथ खडसे

कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाहीत
Published by :
Shubham Tate
Published on

eknath khadse : 40 वर्षाच्या राजकारणात असे मी कधी अनुभवले नाही. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. तांत्रिक बाबींची सोडवणूकीशिवाय हा प्रश्न सूटणार नाही. असे विधान आमदार एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी केले आहे. राज्य सरकार सुरक्षा देण्यास समर्थ आहे. मात्र केंद्र सरकारला वाटते ही सुरक्षा अपुरी आहे. म्हणून केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. इतकेत नाही तर मला छळले मात्र, माझ्या हाती इतकी ताकद आहे की, अनेकांना देशोधडीला लावू शकतो. (eknath khadse crisis statement in Eknath Shinde)

Eknath Khadse
अभूतपूर्व परिस्थिती; एकनाथ शिंदे गटाची थेट सुप्रीम कोर्टात धाव

दुर्देवाने असा विचार मी करत नाही. अशी टीकाही खडसे यांनी केली आहे. कल्याणमध्ये एकनाथ खडसे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपरोक्त टीका केली. सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले तरी या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळ घडतंय, अस म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाहीत.

Eknath Khadse
एकनाथ शिंदेच्या ट्विटने राजकारणात खळबळ, दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांचा केला उल्लेख

भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी केलं. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला खडसे आले होते. यामध्ये अस चित्र दिसतंय की एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणा किंवा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्या निर्णय नुसार, या तांत्रिक बाबींची सोडवणून झाल्याशिवाय प्रश्न निकाली निघणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com