महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत लागणार? फडणवीस म्हणतात...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत लागणार? फडणवीस म्हणतात...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.
Published on

वर्धा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. अशातच, सत्ताधारी-विरोधकांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सगळं कायदेशीर केलं आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत लागणार? फडणवीस म्हणतात...
...तर उध्दव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात; उल्हास बापटांचे मोठे विधान

सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्याआधीच राज्यातील काही राजकीय पंडित आणि पत्रकारांनी निर्णय देऊन टाकला आहे. त्यावर पुढचे कॉम्बिनेशनही करून टाकले. त्यावर सरकारही तयार करुन टाकलं. परंतु, हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे फार मोठं न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहे. काहीही होणार नाही. आम्ही सगळं कायदेशीर केलं आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, 16 आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा नसून विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हंटले आहे. 16 आमदार अपात्रतेचा विषय, त्यानंतर काही आणखी आमदारांवरही अपात्रतेचा मुद्दा आहे. याबाबत सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामध्ये काहींनी मुदत वाढवून मागितली आहे. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही नार्वेकरांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com