शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा; फडणवीस कि पवार कोणाला मिळाला मान?

शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा; फडणवीस कि पवार कोणाला मिळाला मान?

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
Published on

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, कोणालाच निमंत्रण न देण्याचा निर्णय समितीने घेतल्याचे समजते. मराठा आरक्षण मुद्द्यावर सुरु असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, आजच्या बैठकीत कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा; फडणवीस कि पवार कोणाला मिळाला मान?
MLA Disqualification : विधानसभा अध्यक्ष व ठाकरे गटाचे वकिलांमध्येच जुंपली, काय झालं नेमकं?

मराठा समाजाने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पूजा करु देणार नाही, असा इशारा दिला होता. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता मंदिर समितीने कोणालाही पुजेचे निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत मराठा शिष्टमंडळाची चर्चा झाली.

या बैठकीत मराठा समाजाने पाच मागण्या जिल्हाधिकार्‍यासमोर मांडल्या होत्या. त्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याने मराठा समाजाने शासकीय महापूजेला केलेला विरोध माघारी घेतला असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून दिली आहे. यानंतर अजित पवार कि देवेंद्र फडणवीस कोणाला शासकीय महापूजेचा मान मिळणार? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. यावर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वन मराठा समाजाला आवाहन केले होते. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणाले की, आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे, असे आवाहन त्यांनी केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com