काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात; रामदेव बाबांचे खळबळजनक वक्तव्य

काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात; रामदेव बाबांचे खळबळजनक वक्तव्य

राज्यात वाद काही थांबायचे नाव घेत नाहीये. राज्यापालांच्या विधानावरुन वाद सुरु असतानाच आता रामदेव बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Published on

ठाणे : राज्यात वाद काही थांबायचे नाव घेत नाहीये. राज्यापालांच्या विधानावरुन वाद सुरु असतानाच आता रामदेव बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात; रामदेव बाबांचे खळबळजनक वक्तव्य
मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांच्या विधानाचा...; अमृता फडणवीसांकडून पाठराखण

ठाण्यात आयोजित रामदेव बाबा यांचे योगशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बोलताना रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस यांची स्तुती केली. अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत,त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, असे कौतुक रामदेव बाबांनी केले आहे.

या कार्यक्रमात महिलांसाठी योग शिबिराचे साठी आणि त्यानंतर महासंमेलानाचे आयोजन केले होते. महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते व महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र, सकाळी योगा शिबिर झाल्यानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी वादग्रस्त विधान केले. साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबांनी म्हंटले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात; रामदेव बाबांचे खळबळजनक वक्तव्य
माझं काय होईल...; व्यंगचित्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर राष्ट्रवादीचा निशाणा

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पाठराखण केली आहे. मी राज्यपालांना जवळून ओळखते. त्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात. त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतु, त्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे. मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत, असे अमृता फडणवीस यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com