nana patole | ajit pawar
nana patole | ajit pawar Team Lokshahi

शिवसेनेच्या फुटीला अजित पवार जबाबदार, नाना पटोलेंचं विधान

संजय राऊतांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या बैठकीत चर्चा
Published by :
Shubham Tate
Published on

nana patole ajit pawar : महाविकास आघाडीला कॉंग्रेसचं समर्थन कायम आहे. भाजपला रोखण्यासाठी आम्ही आजही मविआसोबत आहोत. संजय राऊतांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच मविआ सरकार 5 वर्ष कायम राहील असा विश्वास कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. (congress nana patole reaction on shivsena and ncp ajit pawar)

कॉंग्रेस कायमच मविआसोबत राहणार आहे, भाजपनेच हा भूकंप घडवून आणला आहे. सरकार पाडण्यासाठी हे भाजपचं कारस्थानं असल्याचे नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले. तसेच अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या असं यावेळी बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मी शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीचा भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

 nana patole | ajit pawar
संजय राऊतांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. या राजकीय भूकंपानंतर उध्दग ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देताच आपले शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडले आणि आपला मुक्काम मातोश्रीवर हलवला. याचदरम्यान बंडखोरांची समजूत काढण्यासाठी गेले रवींद्र फाटकही गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे. फाटकांसोबत संजय राठोड व दादा भुसे हे आमदारही हॉटेलमध्ये पोहचले आहेत.

 nana patole | ajit pawar
का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत काही अपक्ष आमदार देखील आपल्यासोबत असून आणखी काही जण सहभागी होण्यार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे नक्की काय होणार ठाकरे सरकार पडणार की काय अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत. अशातच आता संजय राठोड आणि दादा भुसे यांच्यासोबत रवींद्र फाटकही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना समजवायला सुरतला गेले होते. जर रवींद्र फाटक, संजय राठोड आणि दादा भुसे गेल्यानंतर शिंदे गटात 40 आमदारांची शक्यता आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या गटात फक्त 15 आमदार उरणार आहेत. शिंदे गटामध्ये 5 मित्र पक्ष असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com