चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंसोबत तुलना; चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या मला आश्चर्य...
मुंबई : चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा फुले यांच्याशी केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ वादात सापडल्या आहेत. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला आश्चर्य वाटतय आहे की कोणतेही वाक्य पूर्ण न ऐकता त्यावरून वादंग निर्माण केला जात असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मला आश्चर्य वाटतय आहे की कोणतेही वाक्य पूर्ण न ऐकता त्यावरून वादंग निर्माण केला जात आहे. काल हळदी कूंकूचा कार्यक्रम होता. पण, माझे स्वागत करताना मला पुरुषांनी औक्षण केले. काल पाच पुरूषांनी माझे औक्षण केले. दादा म्हणाले की, तुम्ही भगिणी नेहमी आमचे यश चिंतन करता आता पुरूषांनी पण हे भगिणींसाठी केले पाहिजे. जे माझ्यावर टिका करत आहे. त्यांच्या पक्षात असताना मी अनेकदा हे वाक्य बोलले आहे. तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. जे जेंडर इक्वालिटीवर बोलतात तेच आज आरोप करत आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी विरोधकांवर केली आहे.
मी कोणाचीच तुलना केली नाही. त्यांची जागा कुणीच घेवू शकत नाही. पण ज्यांची समजून घेण्याची कुवत नाही आहे. त्यांना कृतीत काहीच चांगले दिसले नाही. पुण्यात जिथे महिला स्वातंत्र्याची सुरूवात झाली तिथे हे घडत होते. मी काल माझ्या भावना सांगता येणार नाही, अशा आहेत. काल दादा फक्त बोलले नाही तर त्यांनी कृतीत आणले. कोणीच तुलना करू शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
भाजपतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त पुणे येथे 'सन्मान स्त्री शक्तीचा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलत असताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचे केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. मी नेहमी म्हणत असते, आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. असे विधान त्यांनी यावेळी केले होते.