भाजपा मतदारांना पैसे वाटत असल्याचा रविंद्र धंगेकरांचा आरोप; चित्रा वाघ म्हणाल्या...
बारामती : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. अशातच, प्रचार संपताच भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी करत उपोषण केले. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. आरोप-प्रत्यारोप होत असतात हे काही नवीन नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जर असं काही होत असेल तर पोलीस यंत्रणा आपले काम करेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
शेवटी जनमताचा कौल हा फार महत्त्वाचा असतो. आणि पिंपरी-चिंचवड आणि कसबा या दोन्ही विधानसभा गेल्या सात महिन्यापासून शिंदे फडणवीस सरकारने जी विकास कामे केलेली आहेत. आमच्या दोन्ही स्वर्गीय आमदारांनी आपल्या कर्तृत्वावर माणसांची शिदोरी जमा केलेली आहे. आणि त्यालाच कौल म्हणून भारतीय जनता पार्टीला जनमत मिळणार आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेताना भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप होत असतात हे काही नवीन नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जर असं काही होत असेल तर पोलीस यंत्रणा आपले काम करेल. त्यामुळे मी जबाबदारीने सांगते कसबा असो किंवा पिंपरी चिंचवड असो या दोन्ही ठिकाणी येणार फक्त कमळच, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
बारामती दौऱ्याचा प्रयोजनावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, राजकारणामध्ये ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस निवडणुक हे एक युद्ध असत. आणि युद्ध हे जिंकण्यासाठीच लढायचं असतं. त्यामुळे इथेही आम्ही हे युद्ध जिंकल्याशिवाय राहणार नाही. याचा मला सुद्धा विश्वास आहे. चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्या वारंवार येत असतील तर मग मला देखील सारखं यावं लागेल इकडे. येईन पण मी, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावर एमआयआमचे नेते इम्तीयाज जलील यांनी शइंदे-फडणवीसांवर टीका केली आहे. एमआयएमचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे आम्हाला पूर्णपणे माहित आहे. ज्या ठिकाणी चांगलं काम चाललेलं असतं त्या ठिकाणी कुठेतरी टीका करणे विरोधकांचे हे नेहमीच काम झालं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाहीये. इम्तियाज जलील यांनी पूर्णपणे ते वाचायला हवं होतं जे नोटिफिकेशन निघालेलं आहे. यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी त्याचे सविस्तर उत्तर ही दिलेला आहे, असे त्यांनी सांगितले.