uddhav thackeray eknath shinde
uddhav thackeray eknath shinde team lokshahi

Breaking । उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक झटका; शिवसेनेचे 15 खासदार शिंदे गटात?

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्री (Matoshri) आणि शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्री (Matoshri) आणि शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० शिवसेना आमदारांचा गट बनवून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केले. मात्र याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती आहे. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

uddhav thackeray eknath shinde
President Election 2022 : द्रौपदी मुर्मू आज मुंबईत; पाठिंबा देऊनही उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही

दरम्यान, दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदारांचा मोठा गट शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. सध्या याबाबत हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यात शिवसेनेचे १५ खासदार उपस्थित होते. ४० आमदारांनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १५ खासदार वर्षा बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

uddhav thackeray eknath shinde
Rain Update : तानसा नदीने गाठली धोक्याची पातळी, पूर्वे भागाला फटका; अनेक रस्ते पाण्याखाली

शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाल्याचे समोर आले आहे. आमदारांप्रमाणेच शिंदे गट दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आमदार, नगरसेवकांनंतर उद्धव ठाकरेंना शिंदे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com