Uddhav Thackeray | Eknath Sinde
Uddhav Thackeray | Eknath SindeTeam Lokshahi

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!
Published by :
Shubham Tate
Published on

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : राजकारण काही का असेना पण केलेल्या कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिध्द केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी वाढत्या पावसाच्या जोरामुळे मुंबई मनपाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांना आढावा घ्यावा लागला. यावरून बोलताना एकनाथ शिंदे यांनी व्टिटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी व्टिट करत रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! असे म्हटले आहे. (Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | Eknath Sinde
नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा, कारसह दुचाकीस्वारांना दिलासा

दरम्यान, मुंबई मनपा प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर योग्य नियोजन केलेले आहे. शहरातील वॉटर लॉगिंगच्या स्पॉटची संख्या ही कमी झालेली आहे. 299 ठिकाणी हे स्पॉट आहेत. तर हिंदमाता परिसरात पाऊस झाला की पाणी साचते अशी परस्थिती असायची पण आता या भागात देखील पाणी साचत नाही. तर इतर भागात वाहतूक सुरळीत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तरी मुंबई थांबलेली नाही म्हणत शिंदे यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

Uddhav Thackeray | Eknath Sinde
Ed Raid : Vivo सह चीनी कंपन्यांवर मोठी कारवाई, देशभरात 44 ठिकाणी छापे

राज्याच्या काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या 9 आणि एसडीआरएफच्या 4 अशा एकूण 13 टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com