कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा; बावनकुळेंनी शिवसेनेला दिला 'हा' इशारा

कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा; बावनकुळेंनी शिवसेनेला दिला 'हा' इशारा

एकनाथ शिंदे यांची जाहिरात काल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबतची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामधअये छापण्यात आली. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात काल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीच्या चर्चांनीही जोर पकडला होता. परंतु, संबंधित जाहिरात शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटाकडून दिले. आणि देवेंद्र फडणवीसांसोबतची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामधअये छापण्यात आली. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणाचा प्रकार होता. आज शिंदे गटाने जाहिरात देऊन चूक दुरुस्त करण्याचा मोठा प्रयत्न केला. अशा प्रकारे पुन्हा मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या, असा इशारा बावनकुळेंनी शिंदे गटाला दिला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीत त्यांच्यासोबत पंतप्रधान मोदींचा फोटो होता. तसेच, राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी टॅगलाईनही देण्यात आली होती. यावरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना घेरण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आज यु-टर्न मारत दुसऱ्याच दिवशी सर्व वर्तमानपत्रातील जाहिराती बदलल्या आहेत. जाहिरातीत मोदी, शहांसह आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचाही फोटो छापण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com