शिंदे-फडणवीसांचा उध्दव ठाकरेंनी इतका धसका घेतलाय की... : बावनकुळे
कल्पना नालस्कर | नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा गट राजकीय कॉन्ट्रॅक्ट किलर असून कॉन्ट्रॅक्ट किलरचा राजकीय अंतही वाईट असतो, अशा टीका शिवसेनेने (ठाकरे गट) सामना रोखठोकमधून केली आहे. याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंना कुठे गेले तरी शिंदे दिसतात. संताजी धनाजी सारखी त्यांची अवस्था झाली. इतका धसका त्यांनी घेतलाय, अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे.
नागपूर जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीसाठी निवडणुकीत भाजपला धक्का देत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आता फक्त सभापती-उपसभापतीची निवड झाली. त्यामुळं ज्यांच बहुमत त्यावेळी होतं त्यांचाच सभापती उपसभापती बनला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आता गणित मांडणं हे सपशेल चुकीच आहे. तसेच जिल्हा परिषदेमध्ये त्यांचाच बहुमत आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांचाच अध्यक्ष होणार, यात काही विशेष नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मागील वेळी 608 पैकी 294 ग्रामपंतीमध्ये शिंदे-भाजप गटांनी जिंकल्या आहेत. उद्याच्या निकालात भाजप शिंदे गटाच्या युतील 50 टक्क्यांच्या वर ग्रामपंचायत जिंकणार, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, सरकार गेल्यामुळे ते अस्वस्थ झालेत. निवडणूक हरण्याची भीती महाविकास आघाडीला वाटत आहे. त्यामुळं ऑब्जेक्शन घेऊन फॉर्म रद्द करण्याचं षडयंत्र सुरु आहे, असा थेट आरोपच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मागील अडीच वर्षात मंत्रालयात न येता फेसबुकवरून सरकार चालवलं. मंत्रीही अकार्यक्षम होते. त्यामुळं उद्धव ठाकरेंना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देणे आहे. कारण या महाविकास आघाडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोषी मानणाऱ्या काँग्रेसचा विचार उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आहे. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार त्यांना मतदानात करणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
शिंदे हे भाजपचे कॉन्ट्रॅक किलर असल्याचा आरोप आजच्या सामना रोखठोकमधून करण्यात आला आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, ती कॅसेट आता जुनी झालेली आहे. दुसरी वाजवायला कॅसेट नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंना कुठे गेले तरी शिंदे दिसतात. जेवायला बसले असो की खिडकीत, शिवसेनेचा मेळाव्यातही कार्यकर्तामध्ये त्यांना शिंदे-फडणवीस दिसतात. संताजी धनाजी सारखी त्यांची अवस्था झालीय. इतका धसका त्यांनी घेतलाय, अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 150 देशांनी नेते मानले आहेत. कोरोनाच्या काळात अनेक देशांना लसीच्या माध्यमातून लोकांचे जीव वाचविले आहे. आता काही लोकांना पोटदुखी होत आहे. 21 व्या शतकातील जगातले सर्वात मोठे लोकप्रिय नेते आहे. यामुळं ज्या महाविकास आघाडीने अडीच वर्ष महाराष्ट्राला फसवलं, त्यांच्यासोबत जाऊन वंचितचे प्रकाश आंबेडकर कुठला विकास साधणार आहे. त्यांचा पक्ष आहे त्यांनी निर्णय घ्यावा, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.