अजित पवार कधी रडतात कधी पळून जातात, 2024 मध्ये त्यांचाच करेक्ट कार्यक्रम; बावनकुळेंचे प्रत्युत्तर
नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात अप्रत्यक्षपणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे म्हंटले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. अजित पवार रडतात, डोळ्यात पाणी आणतात त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. 2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, असेही बावनकुळेंनी म्हंटले होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजित पवार लढवय्ये आहे. परंतु, अजित पवारांमध्ये माझा करेक्ट कार्यक्रम करण्याचा हिम्मत नाही. बारामती शहर सोडून बाकी ठिकाणी बोकस कार्यक्रम आहेत. अजित दादा यांना नेहमी सत्तेत राहायला आवडतं आणि सत्ता गेली त्यामुळे घाबरले आहेत. माझा बारामतीला एक दौरा झाला तर पवार यांना भीती वाटली. त्यामुळे मी आता वारंवार बारामतीला जाणार, असे त्यांनी म्हंटले आहे.
विदर्भामध्ये अजित पवारांनी चॅलेंज करु नये. अजित पवारांमध्ये माझा करेक्ट कार्यक्रम करण्याचा हिम्मत नाही. दहा-पंधरा दिवस मोबाइल बंद करुन झोपत असतात. कधी रडतात कधी हसतात. 2024 मध्ये त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल. त्यांचा एवढा कार्यक्रम होणार की महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही. बारामतीची जनता राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, अशी टीका त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस स्पाइडर-मॅनसारखे काम करतात. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे समन्वयाने सरकार चालवतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, लोकायुक्त हे अतिशय उत्तम असा ठराव आज मंजूर करण्यात आला आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले. महाराष्ट्र हा भ्रष्टाचारी मुक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. पण, याला विरोधकांनी विरोध दर्शवला कारण त्यांचा भ्रष्टाचार पुढे येईल अशी त्यांना भीती आहे.