शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ समजणारा माणूस अजून महाराष्ट्रात जन्मायचा : चंद्रकांत पाटील
मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन आता राजकीय वातातवरण तापले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट लागू उठली, असे विधान केले. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला आहे. परंतु, यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शरद पवार काय बोलले त्याचा अर्थ काय? हे समजणारा माणूस अजून महाराष्ट्रात जन्मायचा असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधाला.
शरद पवार काय बोललेत आणि त्याचा अर्थ काय आहे? हे समजणारा माणूस अजून महाराष्ट्रात जन्मायचाय. ते बोलतात एक आणि त्याचा अर्थ दुसरा निघतो, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया घाईच होईल. तसेच, आमचं ते चांगलं आणि दुसऱ्याचे ते वाईट ग्रामीण भागात एक म्हण आहे आमचा तो बाब्या...तस आहे. त्यामुळे शरद पवार यांनी असं म्हणणं संयुक्तिक वाटत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे
तर, कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने 50 हजारांच्या मार्जिनने निवडून येतील. आतापर्यंत कसब्यात आमचा उमेदवार ४३ हजार मताधिक्याने निवडून आले होते. आता त्याच्यापेक्षाही जास्त मार्जिन आम्हाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शरद पवारांना भाजप चालतो पण फडणवीस नको होते. शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते. देवेंद्र फडणवीस सोडून कुणी ही मुख्यमंत्री आणि कुठलाही पक्ष चालला असता, असा धक्कादायक खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.