भाजपच्या चित्रा वाघांचे वादग्रस्त विधान; चंद्रकांत पाटालांची केली महात्मा फुलेंसोबत तुलना
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. हा सर्व गदारोळ सुरु असताना आता या गोंधळात पुन्हा भर पडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा फुले यांच्याशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एक मोठा वाद निर्माण होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज भाजपतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त पुणे येथे 'सन्मान स्त्री शक्तीचा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलत असताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचे केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. मी नेहमी म्हणत असते, आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.