Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarAdmin

Kasba Byelection : Ravindra Dhangekar आज कसबा गणपती मंदिराबाहेर उपोषणाला बसणार

पोलिसांना सोबत घेऊन भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. याविरोधात धंगेकर आज उपोषण करणार आहेत.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

पुणे : अमोल धर्माधिकारी | पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असेलली राजकीय रणधुमाळीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, प्रचार संपताच भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महावीकस आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात आज ते सकाळी 10 वाजता कसबा गणपती मंदीरासमोर उपोषणाला बसणार आहेत.

कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळं भाजपचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. त्यामुळं धंगेकरांच्या प्रत्येक हालचालीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळं कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळं कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे.

Ravindra Dhangekar
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

दरम्यान, काल चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी भाजपच (BJP) जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शो नंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. पुण्याचा विकास करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळं हेमंत रासने यांनाच मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं. काल दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com