आम्ही धक्के दिले तर भारी पडणार; भाजप व शिंदे गट आमने-सामने

आम्ही धक्के दिले तर भारी पडणार; भाजप व शिंदे गट आमने-सामने

BJP vs Shinde Group विजय चौगुले यांनी नाईकांवर केले गंभीर आरोप
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी खासदार आमदारांचे पाठबळ मिळवत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण, आता भाजप आणि शिंदे गटामध्ये लढाई रंगताना दिसत आहे. आम्ही धक्के दिले तर भाजपला भारी पडणार, असे इशाराच शिंदे गटाने दिला आहे. यामुळे अंतर्गत कलह रोखण्यास यश येईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदे गटामध्ये शिवसेनेतून इन्कमिंग सुरुच आहे. असे असतानाही शिंदे गटातील तीन नगरसेवकांना भाजपात आणण्यात भाजप आमादार गणेश नाईक यशस्वी झाले. यामुळे एकनाथ शिंदे गट संतप्त झाला आहे.

गणेश नाईकांनी राजकीय अपरिपक्वता दाखवली आहे. शिवसेना-भाजप पक्ष एकत्र असताना शिंदे गटाचे नगरसेवक फोडणे अयोग्य आहे. नाईकांनी वेळ पाहून प्रवेश द्यायला पाहिजे होता, असे शिंदे गटातील विजय चौगुले यांनी म्हंटले आहे. आम्ही धक्के दिले तर नाईकांना भारी पडणार, असा इशाराही चौगुले यांनी दिले आहे.

दरम्यान, भाजप आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दे धक्का देत शिंदे गटातील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचे इन्कमिंग सुरुच आहे. असे असताना शिंदे गटातील नगरसेवकांना भाजपात आणण्यात गणेश नाईक यशस्वी झाले. नवी मुंबईतील दिघा येथील नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com