बाळासाहेब म्हणाले मी पैसे सोडून सर्व खातो; फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे आज तैलचित्राचे अनावरण झाले आहे. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, अतिशय अथांग, खोल असे व्यक्ती व महान नेत्यांच्या मांदीआळीतले बाळासाहेब नेते होते, असे म्हणत त्यांचा किस्साही फडणवीसांनी सुनावला.
मी व मुख्यमंत्री यांनी नार्वेकर यांना विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केली. पण, आजच्या कार्यक्रमाची कल्पकता हे सर्व त्यांनी केलं. मुंबईतला जसा महासागर आहे, तसे बाळासाहेब होते. प्रसंगी शांत, पण जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुफानापेक्षा जास्त संघर्ष करणार असे व्यक्तीमत्व होते. अतिशय अथांग, खोल असे व्यक्ती व महान नेत्यांच्या मांदीआळीतले ते नेते होते. त्यांचे तैलचित्र लागले आहे. पण, त्यांनी या सभागृहात येण्याचा विचार केला नाही. त्यांनी ठरवले असते तेव्हा ते मुख्यमंत्री होऊ शकले असते, असा अप्रत्यक्ष निशाणा देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.
राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांचे कार्टून काढले. त्यावर आर आर पाटील यांनी हक्कभंग आणला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित राहण्याचा आदेश काढला. ते एक व्यंगचित्र, पत्रकार आणि संपादक होते. लोकशाहीवर विश्वास असल्याने ते स्वतः हक्क भंग समितीसमोर गेले. तिथेही त्यांची विनोदबुद्धी दिसली. समितीसमोर असताना चहा विचारला. एकाने विचारले तुम्ही गोड खाता का? बाळासाहेब म्हणाले मी पैसे सोडून सर्व खातो. समितीने सुनावलेली शिक्षा सभागृहाने मागे घेतली, असा किस्साही फडणवीसांनी यावेळी सुनावला.
व्यक्तीला त्यांना ओळखता येत होते. व्यक्ती मोठा कधी होतो, जेव्हा त्यात दिलदारपणा असतो. मनाचा मोठेपणा लागतो. त्यांच्यासोबतच्या लोकांसह त्यांच्या विरोधकांनी अनुभवला. राजकारणात बाळासाहेब ठाकरे हे बोललेला शब्द कधी मागे घेतला नाही. सत्तेचा विचार त्यांनी कधी केला नाही. राजकीय बेरजेसाठी त्यांनी कधी राजकारण केल नाही. मतदारसंघात कोणत्या समाजाची लोक त्या उमेदवाराला तिकीट देण्याचा विचार करतात. पण, बाळासाहेबांनी ज्या समाजाची चार माणसं नाहीत त्यांना निवडून आणले. त्यांच्या विचाराचे धन महत्त्वाचे आहे. जी प्रखरता त्यांनी शिकवली, विचारांची प्रतिबद्धता आपल्यासोबत कायम राहावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. या तैलचित्रातून प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणा घेईल व हिंदुत्वाचा हुंकार पुन्हा येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.