धोका देणाऱ्यांचे राज्य, बंडखोरी करून आलेल्यांनाच मंत्रिपद मिळालंय : बच्चू कडू

धोका देणाऱ्यांचे राज्य, बंडखोरी करून आलेल्यांनाच मंत्रिपद मिळालंय : बच्चू कडू

शिंदे सरकारचा सव्वा महिन्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. परंतु, या मंत्रिमंडळात एकाही अपक्षाला स्थान देण्यात आले नाही. यामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
Published on

मुंबई : शिंदे-फडणवीस यांच्या सत्ता स्थापनेनंतर सव्वा महिन्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. परंतु, या मंत्रिमंडळात एकाही अपक्षाला स्थान देण्यात आले नाही. यामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर आज बच्चू कडू यांनी नाराजी आहे. धोका देणाऱ्यांचे राज्य आहे. जे बंडखोरी करून आलेत. आता त्यांनाच मंत्रिपद मिळालंय, असा घरचा आहेर शिंदे सरकारला दिला आहे.

मंत्रिपदासाठी तिथे गेलो नव्हतो. दिया तो भी भला. नही दिया तो भी भला. मंत्रिमंडळ विस्तार 40 दिवसांनी झाला आहे. तर पुढचे मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये होईल. अथवा अडीच वर्षात होईल असं वाटते. मंत्रिपदासाठी तिथे गेलो नव्हतो, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

धोका देणाऱ्यांचे राज्य आहे. जे बंडखोरी करून आलेत. आता त्यांनाच मंत्रिपद मिळालंय. परंतु, मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलण झालं आहे. त्यांनी शब्द दिला असून मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आज नाही उद्या माझं नाव यादीत येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराचा समावेश न केल्याने विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. यावर बच्चू कडू यांनी अजून मंत्रिमंडळ विस्तार व्हायचं बाकी आहे. जेव्हा महिला घेणार नाही तेव्हा आरोप करा, असे म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com