मुळ शिवसेना कोण? शेलार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये सभागृहात जुंपली

मुळ शिवसेना कोण? शेलार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये सभागृहात जुंपली

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अशातच, मुळ शिवसेना कोणाची या मुद्यावरुन आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये सभागृहात खडाजंगी झाली.
Published on

मुंबई : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अशातच, मुळ शिवसेना कोणाची या मुद्यावरुन आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये सभागृहात खडाजंगी झाली. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. अध्यक्षांकडे शिवसेना उबाठा यांची नोंद झाली आहे का? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला होता.

मुळ शिवसेना कोण? शेलार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये सभागृहात जुंपली
पंतप्रधानांनी शरद पवारांची 10 दिवसात माफी मागावी अन्यथा...; का म्हणाले आंबेडकर असं?

काय म्हणाले आशिष शेलार?

अध्यक्ष महोदय तुमच्याकडे शिवसेना उबाठा यांची नोंद झाली आहे का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना एकच आहे जी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. दुसरी कोणती शिवसेनाच नाही. कारण, खरी शिवसेना इकडे आहे. निवडणूक आयोगाने सांगितले आहे . समान संधी आणि समान न्याय या आधारावर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

भास्कर जाधव यांचा पलटवार

सर्वोच्च न्यायालयाने मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहे. भरत गोगावले नाही, असं सांगितलं आहे. तर, सर्वोच्च न्यायालायपेक्षा निवडणूक आयोग आणि आशिष शेलार मोठे नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com