किरीट सोमय्या ईडीचे दलाल; अनिल परब यांचा निशाणा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीचे किरीट सोमय्या दलाल आहे? आणि असेल तर त्यांनी तसं सांगावं, असा टोलाही त्यांनी सोमय्यांना लगावला आहे.
सदानंद यांच्यावरील कारवाई आश्चर्यजनक आहे. कालच सदानंद कदम यांना ईडीने समन्स पाठवलं. पण, त्यांची सर्जरी झाली ही माहिती ईडीला दिली आहे. बहुतेक खेड सभा झाली याचा परिणाम झाला असावा, असा निशाणा अनिल परब यांनी साधला आहे. सदानंद कदमांनी मान्य केलंय हे त्यांचं स्वत:चं रिसॉर्ट आहे. त्याचा खर्चही त्यांनी दाखवलाय. ईडीचे किरीट सोमय्या दलाल आहे? आणि असेल तर त्यांनी तसं सांगावं, असा टोलाही त्यांनी सोमय्यांना लगावला आहे.
साई रिसॉर्ट दापोली चौकशी सुरु आहे. रिसॉर्टचे पाणी समुद्रात जात म्हणूंन चौकशी सुरु आहे. सदानंद कदम अनेक वेळी चौकशीला सामोरे गेले आहेत. मी देखील चौकशीला गेलो होतो. माझ्या खात्यातून 1 कोटी ट्रान्सफर झाले व हा व्यवहार मी कागदोपत्री दाखवला आहे. मी काहीही चुकीचे काम केले नाही.
ईडी नोटीस आल्यावर अनिल परब यांना उद्धव ठाकरे यांनी वाऱ्यावर सोडल्याची चर्चा सुरु होती. यावर अनिल परब यांनी माझा नेत्यावर माझा विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास आहे, असे म्हंटले आहे.