अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल; मतमोजणी सुरु

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल; मतमोजणी सुरु

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यासह 7 उमेदवार रिंगणात आहे.
Published on

मुंबई : सत्तांतरानंतर आज पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यासह 7 उमेदवार रिंगणात आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल; मतमोजणी सुरु
उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला; म्हणाले, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी...

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असून रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली येथील शाळेमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी शासनाच्या विविध विभागांचे सुमारे २०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत असतील. या निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदान केले होते. तर, भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचे पारडे जड मानले जाते आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल; मतमोजणी सुरु
मुंबईकरांसाठी महत्वाचे; मध्य, हार्बर मार्गांवर उद्या असणार मेगाब्लॉक

दरम्यान, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजप व शिवसेनेकडून (ठाकरे गट) मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरण्यात आला. परंतु, राज ठाकरे व शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक व शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. यानंतर भाजपने निवडणुकीतून माघार घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com