मी अजित अनंतराव पवार...; उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती.
राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांची आज अजित पवार यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मंत्र्यासह राजभवनात दाखल झाले. दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाले असून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. ही शपथ घेताच अजित पवार समर्थकांनी सभागृहात एकच जल्लोष केला. तसेच, दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणाबाजीही करण्यात आली.
अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, भाईदास पाटील, अनिल पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. तर, अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर येत आहे.