राजकारण
महापुरुषांचा अपमान केल्यास...; अजित पवारांच्या संभाजी भिडेंना कानपिचक्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोरच संभाजी भिडेंना कानपिचक्या दिल्या. शिर्डीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई : महात्मा गांधींबाबत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यावर सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात आला असून विरोधकांकडून भिडेंच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोरच संभाजी भिडेंना कानपिचक्या दिल्या. महापुरुषांचा अपमान केल्यास सहन केला जाणार नाही, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे. शिर्डीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.