मी अजून शिक्षकी पेशा स्वीकारला नाही : अजित पवार
मुंबई : मोदी सरकारला आज नऊ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी पवार शैलीत उत्तर दिले आहे. मी अजून शिक्षकी पेशा स्वीकारला नाही, त्यामुळं मला मार्क देता येणार नाही. पण प्रश्न सुटले का हे स्वतःच्या मनाला विचारा आणि आत्मचिंतन करा, असे उत्तर त्यांनी दिले.
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, यापूर्वीही महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य केलीत. आम्ही त्यावर जाब ही विचारला. यावेळी तर त्यांनी कहरच केला. सावरकरांच्या अर्ध पुतळ्याचे उदघाटन करताना सावित्रीबाई फुले, आणि अहिल्याबाई होळकर यांचे अर्ध पुतळे हटवले. हे करायला नको होतं. हे जाणीवपूर्वक होतय का हे माहित नाही.
पुण्याच्या लोकसभा मतदारसंघाबाबत ते म्हणाले, इलेक्टिव मेरीट बघून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा असा विचार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत आमची काही ठिकाणी आघाडी होती. लोकसभा, विधानसभा आम्ही एकत्र लढल्याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारला रोखता येणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. जिथे आमची ताकद आहे तिथे आणखी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मोदी सरकारला आज नऊ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी अजून शिक्षकी पेशा स्वीकारला नाही, त्यामुळं मला मार्क देता येणार नाही. पण प्रश्न सुटले का हे स्वतःच्या मनाला विचारा आणि आत्मचिंतन करा, असे उत्तर त्यांनी दिले.