Ajit Pawar : आमच्या शिंदे साहेबांची गाडी आज सुसाट सुटली होती

Ajit Pawar : आमच्या शिंदे साहेबांची गाडी आज सुसाट सुटली होती

अजित पवांराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया
Published on

मुंबई : विधानसभेत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुम्ही आजपर्यंत तुमचे असे भाषण मी कधीच ऐकले नव्हते, असे म्हंटले आहे. त्यांच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्यावद्दल आभार प्रस्तावावर ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, 2004 पासून मी तुम्हाला आमदार म्हणून पाहिले आहे. 2004 पासून ते 2022 पर्यंत तुमचे असे भाषण मी कधीच ऐकले नव्हते. माझी फार बारीक नजर असते मी तुमच्या चेहऱ्यांवरचे हावभाव पाहत होतो. तुम्ही भाषण खुलून करत होता. आणि त्याचवेळी तुमच्या उजव्या बाजूला बसणारे उपमुख्यमंत्र्यांचे हावभावही मी पाहत होतो. ते सारखे बोलत होते आता बस झाले, आता थांबा. एवढ्या वेळा त्यांनी सांगितले. हे मी जयंत पाटील यांनाही सांगितले. पण, आमच्या शिंदे साहेबांची गाडी अशी सुसाट सुटली होती की ती बुलेट ट्रेनच झाली होती. ते काही थांबयला तयार नव्हते.

जसे मी सांगितले होते समोरुन टाळ्या पडायला लागल्यावर वक्ता बोलत जातो आणि नंतर कधी घसरतो ते त्यालाच माहित नाही. तसे काही आपल्या मुख्यमंत्र्यांचे पहिल्याच भाषणात होऊ नये म्हणून ती काळजी उपमुख्यमंत्र्यांना होती. मागे बसलेले दीपक केसकरांचाही जीव तुटत होता की काय होतय. गाडी कधी थांबतीये. तर, गुलाबराव पाटीलही तिक़डून नका नंतर काय ठरलय ते सांगू नका, काल कोणता आमदार भेटायला आला ते सांगू नका, अशा भावना होत्या हे सर्व मी पाहत होतो. अखेर एकनाथ शिंदे यांनी मन मोकळे केले. कारण अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.

शेवटी मन दुखावले जाते. मन दुखावले की जीवाला लागते, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. सभागृहात वारंवार न्यायपालिकेला हस्तक्षेप करण्याची संधी अध्यक्ष आणि कोणीही देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले

कोरोनामुळे पहिल्या अधिवेशनानंतर अधिवेशन झालंच नाही. मागील अडीच वर्षात मंत्र्याना मतदारसंघातील कामांसाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही असं अजित पवारांनी सांगितले. शिवराज पाटील ४२ वर्षांचे असताना अध्यक्ष झाले होते, आम्ही चुकून तुम्ही सर्वात तरुण अध्यक्ष असल्याचा उल्लेख झाला, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी दिले.

मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षातून काम केलं आहे. १९९० मध्ये मी, जयंत पाटील, आर आर पाटील आलो. अनेक नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची ताकद काय असते दाखवून दिलं आहे. लोकशाहीत विधीमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष या पदाप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचं असतं, असेही अजित यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com