Raj Thackeray | devendra faadnvis
Raj Thackeray | devendra faadnvisTeam Lokshahi

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, भाजपसोबतची जवळीक कायम ठेवणार?

भाजपसोबतची जवळीक कायम ठेवणार?
Published by :
Shubham Tate
Published on

Raj Thackeray : राज्यात सध्या राजकारणात चांगल्याच उलथा-पालथी पाहायला मिळत आहे. प्रादेशिक पक्षांनी देखील चांगलीच कंबर कसलेली पहायला मिळत आहे. याच कारण म्हणजे राज्यातील अनेक महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या महापालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूका देखील जाहीर झाल्या आहेत. अशातच नुकतेच राज्यात नाट्यमय असे सत्ता परिवर्तन झाले आहे. (After the surgery, Raj Thackeray will maintain his closeness with the BJP in action mode)

Raj Thackeray | devendra faadnvis
Parle-G च्या या निर्णयाचं होतंय कौतुक, कंपनीचे नुकसान होईल का?

दरम्यान, यासगळ्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दूर होते, कारण नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ते डाॅक्टरांच्या सल्ल्याने आराम करत असल्याचे दिसले. यानंतर आता राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. याच पारर्श्वभूमीवर त्यांनी मनसेची मुंबईत 22 तारखेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. तर 23 तारखेला राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

Raj Thackeray | devendra faadnvis
बावनकुळेंनी दिला राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदाराचा भाजप प्रवेश

त्यामुळे येत्या निवडणूकीत राज ठाकरे कोणते अस्त्र बाहेर काढणार हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच ते आजारी असताना त्यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे हे राज्यभर दाैरे करताना दिसत होते. राज ठाकरे यांच्या 22 आणि 23 तारखेच्या बैठकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपसोबतची जवळीक कायम ठेवणार?

मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढल्याचे दिसून आले आहे. आता राज ठाकरे ॲक्टिवह मोडमध्ये आल्यानंतर ही जवळीक कायम ठेवणार की एकला चलो रेची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच कारण म्हणजे दोन महिन्यांपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. मध्यंतरीच्या काळात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनासोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मराठी मतांची पोकळी शिंदे सेनेमुळे आता पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे मनसेचे देखील लक्ष असणार बारिक लक्ष आहे आणि जनतेचे मनसेच्या निर्णयाकडे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com