अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळले; आदित्य ठाकरे म्हणाले, मला कुणाच्याही...

अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळले; आदित्य ठाकरे म्हणाले, मला कुणाच्याही...

अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळण्यावर Aditya Thackeray यांची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : शिंदे गटाने (Shinde Group) आपला व्हीप अधिकृत असल्याचा दावा करत शिवसेनेच्या (Shivsena) 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. परंतु, यातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव वगळण्यात आले आहे. यावर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळले; आदित्य ठाकरे म्हणाले, मला कुणाच्याही...
Uddhav Thackeray : 'काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती'

आदित्य ठाकरे म्हणाले की, मी शिवसैनिकांचा आवाज ऐकतो आणि शिवसैनिकांचा आवाज आम्हाला प्रत्येक ठिकाणी आधी पण येत होता आणि आता पण येत आहे. प्रत्येक शिवसैनिकांचा आवाज उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

गेल्या दोन अडीच वर्षात जे काय चांगलं काम झालं, ते लोकांसमोर आहे. आम्ही काही बोललो नाही. आपली काम लोकांसमोर आहेत. शिवसैनिकांसोबत जे एकनिष्ठ आमदार राहिलेले आहेत आम्ही त्यांच्यासोबत राहू, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळले; आदित्य ठाकरे म्हणाले, मला कुणाच्याही...
'उदय सामंतांनी शिवसेना वाढविली नाही तर शिवसेनेने त्यांना वाढविले'

तसेच, आम्ही कॉन्फिडंट आहोत की जे पळून गेलेत ते निवडणुकीमध्ये पडतील. मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत. आणि मध्यावधी निवडणुका महाराष्ट्रात लागतील ही शक्यता आहे, असे भाकीत आदित्य ठाकरे यांनी वर्तविले आहे.

बंडखोर आमदारांविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला काय वाटतं हे त्यांनी स्वतः आरशात बघून बोलायला हवे. मला कोणाच्याही खास प्रेमाची मला गरज नाही. आमचा अधिकृत व्हीप आहे. न्यायप्रविष्ट गोष्टी असतील तर आमचा व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या बंडाळीनंतर खरी शिवसेना कोणाची असा वाद रंगला आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या व्हीप अधिकृत घोषित केला. यावरुन आता वाद सुरु झाला असून शिंदे सरकारही मैदानात उतरली आहे. यानुसार शिंदे गटाने आपला व्हीप अधिकृत असल्याचा दावा करत शिवसेनेच्या 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. परंतु, यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव दिलेलं नाही, असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com