माझ्या राजीनाम्यासाठी विरोधक 25 वर्षांपासून देव पाण्यात ठेवून बसलेत :  सत्तार

माझ्या राजीनाम्यासाठी विरोधक 25 वर्षांपासून देव पाण्यात ठेवून बसलेत : सत्तार

गायरान घोटाळा, कृषी महोत्सवाच्या वसूली टार्गेट अशा विविध आरोपांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत.
Published on

अनिल साबळे | औरंगाबाद : गायरान घोटाळा, कृषी महोत्सवाच्या वसूली टार्गेट अशा विविध आरोपांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. यावरुन सत्तारांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या राजीनाम्यासाठी विरोधक 25 वर्षांपासून देव पाण्यात ठेवून बसलेत :  सत्तार
मनाची थोडी लाज उरली असेल तर...; मनसेची बांदेकरांना विनंती

सिल्लोड मतदार संघातील विरोधकांना राजीनाम्याची अपेक्षा होती, असे अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की, मतदार संघातील माझे विरोधक गेल्या 25 वर्षांपासून आपले देव पाण्यात ठेवून बसले आहे. मात्र, त्याच्या मनात खोटं असल्याने देव त्यांना पावत नाही. मी सत्याने काम करत असल्याने देव मला साथ देतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर आता अब्दुल सत्तारांच्या संपत्तीच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com