50 आमदार राऊतांवर हक्कभंग आणणार? सत्तार यांचे सूचक विधान

50 आमदार राऊतांवर हक्कभंग आणणार? सत्तार यांचे सूचक विधान

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाचे 50 आमदार हक्कभंग आणणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत
Published on

प्रवीण बाबरे | पालघर : लोकशाही राज्यात कोणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असेल किंवा विनाकारण कोणाला बदनाम करत असेल तर त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो आणि त्या पद्धतीची पुढील कार्यवाही विधानसभेचे अध्यक्ष करतात, असं सूचक वक्तव्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाचे 50 आमदार हक्कभंग आणणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तार आज पालघरमध्ये बोलत होते.

50 आमदार राऊतांवर हक्कभंग आणणार? सत्तार यांचे सूचक विधान
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करताहेत; भास्कर जाधवांच्या विधानाला पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

अब्दुल सत्तार आज पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी आधी प्रति एकरी मागे दहा हजार रुपये देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला असून यावर सरकारही सकारात्मक असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितलं.

हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं. याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं आहे. तसंच पालघरमध्ये युरिया खताचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा आश्वासन सत्तार यांनी दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com