मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत 18 आमदार हजर होते का? संजय राऊत म्हणाले...

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत 18 आमदार हजर होते का? संजय राऊत म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत केवळ १८ आमदार होते हे वृत्त चुकीचं आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच दरम्यान सचिव मिलिंद नार्वेकर आणि नेते रवींद्र फाटक मुंबईहून गुजरातमधील सूरत शहरात गेले होते. तिथे जवळपास अर्धा तास चर्चा केल्यानंतर नार्वेकर-फाटक माघारी निघाले. या भेटीत झालेल्या चर्चा, अटी-शर्ती, मागण्या किंवा प्रस्ताव यांचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत केवळ १८ आमदार होते हे वृत्त चुकीचं आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत 18 आमदार हजर होते का? संजय राऊत म्हणाले...
शिवसेनेतील आतापर्यंतचे बंड अन् बंडखोर नेत्यांचे काय झाले?

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत साधारणपणे ३०-३१ आमदार उपस्थित होते. त्यांची यादी तिकडे आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली आहे. काही आमदार आमच्याशी दुरध्वनीवरून संपर्कात होते. सुहास कांदे, प्रताप सरनाईक, लता सोनावणे इत्यादी संध्याकाळपर्यंत पोहचतील.”

“लता सोनावणे जात प्रमाणपत्राच्या एका खटल्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचा खटला आहे त्यासाठी ते दिल्लीत न्यायालयात आहेत. सुहास कांदे यांना सकाळीच सीबीआयची नोटीस आली आणि ते सीबीआय कार्यालयात गेले. असे अनेक आमदार जिकडे तिकडे आहेत. त्यातील ३१ आमदार मुंबईत होते. त्यांची यादी आणि सह्या आहेत,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com