सर्वसामान्यांना त्रास देणं ही भाजपची संस्कृती: नाना पटोले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी झाली. त्यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वा. वांद्रे (Bandra) कुर्ला (Kurla) संकुलातील सायबर (Cyber) पोलीस ठाण्यात (Complex) बोलावलं होतं. मात्र भाजप चांगलीच आक्रमक झाल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला न बोलवता त्यांच्या घरी जावून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होणार हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भजपकडून संपूर्ण राज्यभर ह्या चौकशीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. ह्या निषेधात्मक निदर्शनांवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांची प्रतिक्रीया आली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
"ज्या पद्धतीने केंद्रात बसल्यानंतर ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू करून सीबीआय मागे लाऊन अनेक राज्यातील सरकार पाडलं हे जनतेला माहीत आहे. दुसऱ्यांवर कारवाई झाली की पेढे वाटायचे आणि स्वतःवर कारवाई होतेय म्हणून आंदोलन करून सर्वसामान्यांना त्रास देण्याची ही भाजपची संस्कृती आहे."
अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.