Thackeray government to introduce bill for OBC reservation
Thackeray government to introduce bill for OBC reservation

Maharashtra Budget Session 2022 | ओबीसी आरक्षण विधेयक अधिवेशनात एकमताने मंजूर

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा (Maharashtra Budget Session 2022) दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. आज सभागृहात ओबीसी विधेयक आणण्यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (obc reservation) यांनी दिली होती. या विधेयकाचा मसुदा मध्य प्रदेशच्या धरतीवर असणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षण विधेयक सभागृहात मांडण्यात आले आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारने स्वतःकडे घेतले आहे.

प्रभागरचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे, राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे.

निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांसंदर्भात राज्य सरकारसोबत सल्लामसलत करूनच निर्णय घेईल, अशी सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे. सुधारणा विधेयक आमदार सुनील प्रभू यांनी अधिवेशनात मांडलं. मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com