जितेंद्र आव्हाडांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या

जितेंद्र आव्हाडांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या

वैभव कदम यांची अनंत करमुसे प्रकरणात सुरु होती चौकशी
Published on

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे माजी सुरक्षा रक्षक वैभव कदम यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेले काही दिवसांपासून करमुसे मारहाण प्रकरणात त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळेच ते प्रचंड तणावाखाली होते. यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या
भाजपवर शोककळा! 3 महिन्यात तीन लोकप्रतिनिधी गमावले

वैभव कदम अनंत करमुसे प्रकरणाच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड होते. याप्रकरणी त्यांनाही आरोपी बनविण्यात आले असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान, त्यांची मानसिक स्थिती कशी होती हे त्यांनी ठेवलेल्या फेसबुक आणि व्हाट्सप स्टेटसवरून समोर आलं. त्यांनी ठेवलेल्या त्यांच्या शेवटच्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलंय पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे मी आरोपी नाही आहे, असे त्यांनी म्हंटले होते. त्यामुळे तणावाखाली त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. परंतु, अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या माहितीनुसार, वैभव कदम हे आज सकाळी निळजे तळोजा येथे जखमी अवस्थेमध्ये सापडले. तेथून दिवा येथे त्यांना उपचारासाठी नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. वैभव कदम यांना ठाणे लोहमार्ग पोलीस यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात घेऊन आले आहेत. ठाणे लोहमार्ग आणि ठाणे शहर पोलीस यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

नेमके काय आहे अनंत करमुसे प्रकरण?

फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com