शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन पुन्हा सांगतो, मी चुकीचं काही केलं नाही – अनिल परब
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी काहीही चुकीचं काम केलं नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल, असं परब यांनी सांगितलं.
शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांना ईडीने समन्स बजवून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज अनिल परब हे ईडी कार्यालयात जात आहेत. पोलिसांनीही ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.