अयोध्येनंतर शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे; पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांनी रविवारी अयोध्येचा दौरा केला. यावरुन विरोधकांनी शेतकरी संकटात असताना सत्ताधारी दौऱ्यावर असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. यावेळी सरसकट पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कृषी आयुक्तांना दिले आहेत.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक येथील नीताने, ढोलबारेमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक तसेच द्राक्ष उत्पादकांच्या शेताची पाहणी केली आहे. सरसकट पंचनामे करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांजवळ शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कृषी आयुक्तांना आदेश दिले आहेत.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हाधिकांऱ्याना सूचना दिलेल्या असून युध्दपातळीवर पंचानामे सुरु झालेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
तर, शेतकरी आमचा मायबाप आहे. त्यांच्यावरील आरिष्ट, संकटं दुर कर. त्यांना सुख समानाधनाचे दिवस येऊ दे. बळीराजाला संकटमुक्त कर, असे साकडे एकनाथ शिंदे यांनी श्रीरामाला घातल्याचे सांगितले आहे.