Budget 2023 : मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी शिंदे-फडणवीसांची भरीव तरतूद; जलयुक्त शिवार 2.0 घोषणा

Budget 2023 : मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी शिंदे-फडणवीसांची भरीव तरतूद; जलयुक्त शिवार 2.0 घोषणा

मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
Published on

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस प्रथमच बजेट मांडत आहेत. अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला असल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले. मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

Budget 2023 : मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी शिंदे-फडणवीसांची भरीव तरतूद; जलयुक्त शिवार 2.0 घोषणा
Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वर्षाला मिळणार 12 हजार

मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठविण्यात आला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी व बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी तसेच, धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून पाणी मिळण्यासाठी वॉटर ग्रीड निर्माण करण्याचं काम चालू आहे.

तसेच, हर घर जल जनजीवन मिशनमध्ये 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणीसाठी सुमारे 20 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी जलसंवर्धन आवश्यक आहे. यानुसार मागील काळात बंद करण्यात आलेली जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा कार्यन्वित करण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जलयुक्त शिवार योजना 25 हजार गावांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com