महाराष्ट्र
राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे 70 हजार कोंबड्या नष्ट
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात बर्ड फ्लू'चा संसर्ग वाढू नये यासाठी आतापर्यंत ७२ हजार कोंबडय़ा नष्ट केल्या गेल्या आहेत.तसेच ज्या भागातील 'बर्ड फ्लू'चे नमुने सकारात्मक आहेत त्या भागातील १० किलोमीटर परिसरात पाहणी करून नमुने घेतले जात आहेत.
कोंबडय़ांच्या मृत्यू 'बर्ड फ्लू'ने झाल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या स्थळापासून एक किलोमीटरचा परिसर नियंत्रित क्षेत्र घोषित करून त्या भागातील कोंबडय़ा व इतर पक्षी नष्ट केले जातात. पशुसंवर्धन विभागाकडून कळवण्यात आले की, आतापर्यंत ७२ हजार १०६ कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्या आहेत. यासोबतच नष्ट केलेल्या कोंबडय़ांसाठी शासनाकडून मदत दिली जात आहे.