राज्यसभा निवडणुकीतून धडा? विधान परिषदेकरिता शिवसेनेची विशेष योजना

राज्यसभा निवडणुकीतून धडा? विधान परिषदेकरिता शिवसेनेची विशेष योजना

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता केवळ एकच दिवस बाकी असून महाविकास आघाडी आणि भाजपच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) आता केवळ एकच दिवस बाकी असून महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि भाजपच्या (BJP) बैठकांचे सत्र सुरु आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीतून धडा? विधान परिषदेकरिता शिवसेनेची विशेष योजना
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या दरात घसरण

राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आपआपल्या उमेदवारास जास्त मते मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी अपक्षांना फोनाफोनी केली जात आहे. गुप्त मतदान असल्याने क्रॉस व्होटिंगचा फटका बसू नये यासाठी सर्वच पक्षीयांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. यानुसार शिवसेनेनेही सर्तक झाली असून कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे हे शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता विश्वास उरला नसल्याचे समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी आपल्या कोट्यात वाढ केल्याने गोंधळ झाला होता. व शिवसेना उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यातून धडा घेऊन उध्दव ठाकरे यांनी आधीच सावध पावले उचलत असल्याचे दिसत आहे.

राज्यसभा निवडणुकीतून धडा? विधान परिषदेकरिता शिवसेनेची विशेष योजना
स्वस्तात मस्त! ई-वॉटर टॅक्सीतून आता सागरी सफर

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने असून मुख्यतः कॉंग्रेससोबत ही लढत असणार आहे. शिवसेनेकडे 55 मते असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांचा विजय निश्चित आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे सहयोगी अपक्ष आमदारांच्या बळावर विजयी होतील. तसेच काँग्रेसचे दुसरे उमेदवार निवडून येण्यसाठी आठ मतांची गरज आहे. यामुळे काँग्रेसकडून आपले उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

तर, राज्यसभेत भाजपने मिळवलेल्या विजयामुळे पक्षातील नेत्यांचे मनोबल वाढले आहे. आपले पाचही उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपकडून केला जात असतांना राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे निवडून येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीतून धडा? विधान परिषदेकरिता शिवसेनेची विशेष योजना
नीरज चोप्राचा फॉर्म कायम! फिनलॅण्डमध्ये कुओर्ताने स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक

दरम्यान, विधान परिषदेचं मतदान हे येत्या 20 जूनला होणार असून, 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com