LOKशाहीच्या बातमीचे विधानसभेत पडसाद; मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला
Admin

LOKशाहीच्या बातमीचे विधानसभेत पडसाद; मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला

मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला आहे. लोकशाही न्यूज मराठीने हा मराठी शाळांच्या विषय धरुन ठेवला होता. आज भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी हा मुद्दा उपस्थित केला असून अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महापालिका मराठी माध्यम शाळांसाठी एकूण ३ हजार २१३ पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील केवळ १ हजार १५४ पदांवर शिक्षक कार्यरत असून २ हजार ०५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

जिथे मराठी शाळांमध्ये शिक्षकच नसतील, तिथे दर्जेदार शिक्षण तरी कसे मिळणार? हे मुंबई महापालिकेच्या लक्षात येत नाही का? असा सवाल भातखळकरांनी विचारला. मराठी शाळांऐवजी इंग्रजी शाळा सुरु केल्या जात आहेत. मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे? याची चौकशी करावी असे अतुळ भातखळकर विधानसभेत म्हणाले.

तसेच गुजराती माध्यमाच्या २३, तर हिंदी माध्यम शाळांमधील शिक्षकांचीही फक्त २६ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे फक्त इंग्रजीच नव्हे, तर गुजराती व हिंदी माध्यमच्या तुलनेत मुंबईत मराठी माध्यम शाळांना सावत्र वागणूक मिळत आहे. अशी टीका भातखळकरांनी केली. एकीकडे मराठी शाळांमधील ६४ टक्के पदे रिक्त असताना महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदाचा आकडा फक्त १४ टक्के इतका आहे. जराती माध्यमाच्या २३, तर हिंदी माध्यम शाळांमधील शिक्षकांचीही फक्त २६ टक्के पदे रिक्त आहेत. परिणामी, मुंबईत मराठी टिकवण्यासाठी आज महापालिका प्रशासनास प्रत्येक राजकीय व्यक्तीसह मराठी मुंबईकराने जाब विचारण्याची गरज आहे. असे अतुळ भातखळकर यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com